संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील ऐतिहासिक सरसेनापती म्हाळोजीराजे घोरपडे यांच्या समाधीस्थळाला रत्नसिंधू समृद्धी योजनेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार विनय नातू यांनी नुकतीच भेट देऊन परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी समाधीस्थळाच्या संवर्धनासह पर्यटन विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संगमेश्वर तालुक्यातील कसबा, कळंबस्ते, फणसवणे, कारभाटले, नायरी, तिवरे, शृंगारपूर आणि निवळी या गावांना ऐतिहासिक वारसा लाभला असून या संपूर्ण पट्ट्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा शासनाचा मानस असल्याचे माजी आमदार विनय नातू यांनी यावेळी सांगितले. शासनाने तयार केलेल्या कृती आराखड्याची तसेच या विकासकामांसाठी प्रस्तावित निधीची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना आमदार नातू म्हणाले की, "कारभाटले येथील सरसेनापती म्हाळोजीराजे घोरपडे यांचे समाधीस्थळ हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्थळाचा विकास झाल्यास इतिहासप्रेमी व पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र ठरेल.
या कामासाठी मी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन." ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विकास हा प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. गुहागर तालुक्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, "पूर्वी गुहागरमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने विशेष सुविधा नव्हत्या. मात्र नियोजनबद्ध विकास, विविध पर्यटन प्रकल्प आणि पायाभूत सुविधांमुळे आज गुहागर तालुका पर्यटन नकाशावर ठळकपणे दिसून येतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर कसबा ते शृंगारपूर हा संपूर्ण ऐतिहासिक परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा आमचा मानस आहे." या भेटीदरम्यान परिसरातील ऐतिहासिक वारसा, उपलब्ध सुविधा, पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
स्थानिक नागरिकांनीही समाधीस्थळाच्या जतन व संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जाधव, ऐतिहासिक कीर्तनकार श्रीनिवासजी पेंडसे, आ. नातू यांचे स्वीय सहाय्यक श्रीरंग कुंभार, सरसेनापती म्हाळोजीराजे यांचे वंशज संतोष घोरपडे, सुरेश घोरपडे, हनुमंत घोरपडे, राजेंद्र घोरपडे, गणेश तावडे (पोलीस पाटील), राहुल गुरव, महेंद्र होडे, बाळू होडे, शंकर खाडे, शांताराम भारती, मारुती पवार तसेच कारभाटले परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे कारभाटले येथील ऐतिहासिक म्हाळोजीराजे घोरपडे समाधीस्थळाच्या संवर्धन आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.