loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतळूक येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते ‘दत्तात्रय (अण्णा) ओक’ यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन.

वेळणेश्वर(उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी माजी अध्यक्ष, कोतळूक गावचे माजी सरपंच भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते, अयोध्या श्रीराम मंदिर लढयात दोन वेळा कारसेवक म्हणून गेलेले, गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाचे माजी अध्यक्ष, जुनी काँग्रेस नंतर माजी कै. तात्यासाहेब नातू, माजी आमदार डॉ विनय नातू यांच्या प्रचारात सक्रीय काम करणारे दत्तात्रय काशिनाथ ओक यांचे अल्पशा आजाराने आज शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोतळूक उदमेवाडी श्री हनुमान मंदिर, जन्मोत्सवात मोठे योगदान असलेले, गोरगरीबांना आधारवड ठरणारे, नाटकांमध्ये उत्तम अभिनय करणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, जुन्या काळात भातगाव परिसरात जनसंघ ते भाजपा पायी प्रवास करून प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळणारे, गुहागर खालचापाट येथील गोकुळाष्टमी उत्सवात हिरहिरीने सहभागी होऊन तरूणांना प्रोत्साहित करणारे, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्यावर उदया सकाळी ८ वा. कोतळूक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे, पंतू असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg