loader
Breaking News
Breaking News
Foto

डंपर अंगावर पडून चालक मृत्युमुखी, अडखळ येथील घटना

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी येथे गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १. च्या सुमारास खडी खाली करून केळशी येथे परत येत असताना आयशर टेम्पो रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी खचल्यामुळे मातीत रुतला. सदर आयशर टेम्पो कशा पद्धतीने काढता येईल या उद्देशाने चालक नवनीत भिसे मु.केळशी वय ३० वर्षे हा खाली उतरला असता अचानक टेम्पो मातीत रुतून खचल्यामुळे उजव्या बाजूला उलटला आणि त्याखाली चालक नवनीत भिसे चिरडला गेला. डंपर मालक मिथुन प्रकाश चिंचघरकर यांना तातडीने क्लिनर ने बोलावून घेतले आणि त्यानंतर चालकाला डंपर खालून काढून त्याला बाजूला करून दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे पहाटे साडेचार वाजता आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी अंती त्याला मयत घोषित केले. सदर घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg