loader
Breaking News
Breaking News
Foto

PWD उपविभाग खेडच्या चुकीच्या कामामुळे ऐनवरे येथे २ एकर भातशेती उद्ध्वस्त

खेड - खेड तालुक्यातील ऐनवरे ते सवेणी लिंगायत वाडी (ग्रा.मा. २७३) रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्याकडून झालेल्या गंभीर तांत्रिक चुकीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अर्थसंकल्पीय कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत सुमारे १ कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे सुधारणा व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. पूर्वी या ठिकाणी पाण्याच्या निचर्‍यासाठी असलेली पारंपारिक दगडी मोरी व्यवस्थित कार्यरत होती. मात्र, नवीन रस्ता करताना संबंधित ठेकेदाराने व अभियंत्यांनी पाण्याचा पाईप योग्य पातळीपेक्षा वर बसवल्याने शेतातील पाण्याचा निचरा पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, ऐनवरे येथील शेतकरी सुरेश दगडू पोफळकर यांची सुमारे २ एकर भातशेती जलमय होऊन संपूर्ण पीक कुजून नष्ट झाले आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, खेड यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. प्रमुख मागण्या - १. उपविभाग खेड च्या अधिकार्‍यांनी तात्काळ जागेवर येऊन पाहणी करावी, २. चुकीच्या पद्धतीने बसवलेला पाईप योग्य पातळीवर बसवून पाण्याचा निचरा कायमस्वरूपी सुरळीत करावा, ३. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास, वरिष्ठ कार्यालय व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचा इशारा सुरेश दगडू पोफळकर, (रा. ऐनवरे, ता. खेड) यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg