loader
Breaking News
Breaking News
Foto

राजवाडीत लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे अपघाताचा धोका; महावितरणच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त, संतोष थेराडेंकडून पाहणी

​संगमेश्वर /सत्यवान विचारे : संगमेश्वर: तालुक्यातील राजवाडी गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत. त्यामुळे गावात एखाद्या मोठ्या अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे यांचे लक्ष वेधले होते. ​तक्रारीची तात्काळ दखल घेत संतोष थेराडे यांनी स्वतः राजवाडीत जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत, "नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि या लोंबकळणाऱ्या तारा तातडीने पूर्ववत करा," अशा कडक सूचना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांच्या मते, या धोकादायक तारांबाबत महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. या पाहणी दौऱ्यावेळी पंचायत समिती सदस्य दत्ता लाखन, अरविंद जाधव, बंड्या लिंगायत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg