खेड : (प्रतिनिधी) - रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड येथे केंब्रिज इंग्लिश फेलिसिटेशन व पालक मार्गदर्शन सेमिनार उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी केंब्रिज इंग्लिश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच पालकांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी तसेच रो. संकेत बुटाला, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटचे वेस्ट, सेंट्रल इंडिया आणि बांगलादेश विभागाचे व्यवस्थापक धनंजय कदम उपस्थित होते.
प्रास्ताविकात केंब्रिज इंग्लिश पात्रतेचे जागतिक महत्त्व, विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्य विकासातील भूमिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर Starters, Movers, Flyers, A2 Key आणि B1 Key या विविध स्तरांवर उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी धनंजय कदम यांनी पालकांना मार्गदर्शन करताना केंब्रिज इंग्लिश पात्रतेचे जागतिक महत्त्व, परीक्षेची रचना, भाषा आत्मसात करण्याच्या प्रभावी पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व संवादकौशल्य विकसित करण्यासाठी पालकांची भूमिका आणि भविष्यातील शैक्षणिक संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमात केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर केंब्रिज इंग्लिश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना यशस्वी घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या केंब्रिज इंग्लिश शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, रो. संकेत बुटाला, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, प्रा. बाळासाहेब राऊत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे समर्पण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि मेहनत यांचे मोल अधोरेखित करण्यात आले. यानंतर पालकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहरान मुल्लाजी, पूर्वी सूर्यवंशी, सारा धामणकर, ओजल मोदी यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा आणि पालक-शाळा यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणारा ठरला. शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.