loader
Breaking News
Breaking News
Foto

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर 'साईंचे सोबती' पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन

पनवेल : लेखक रमेश भोळे लिखित 'साईंचे सोबती' या लोकप्रिय पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री साईबाबा मंदिर, पनवेल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पुस्तकाचे प्रकाशन वेदशास्त्रसंपन्न आचार्यांच्या हस्ते विधिवत पूजन व मंत्रोच्चारात करण्यात आले. यावेळी माजी मुख्याधिकारी सुदाम धुपे, पत्रकार गणेश कोळी, दीपक महाडिक, बाळू जमलेदार, राजेश डांगळे, अॅड. गजानन करावकर, डॉ. महिंद्रकर, संपादक अनिल भोळे यांच्यासह शेकडो साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'साईंचे सोबती' या पुस्तकामध्ये श्री साईबाबांच्या सहवासात १५ ते २० वर्षे राहून त्यांची सेवा करणाऱ्या तसेच साईकृपेचा लाभ झालेल्या ३९ साईभक्तांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. श्री साई चरित्रामध्ये या भक्तांचा वारंवार उल्लेख आढळतो. त्यामुळे या भक्तांविषयीची माहिती जाणून घेतल्यास श्री साई सच्चरित्र अधिक सखोलपणे समजण्यास मोठी मदत होते. याच कारणामुळे प्रत्येक साईभक्ताच्या संग्रही हे पुस्तक असणे आवश्यक असल्याचे लेखकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पुस्तकात श्री साईबाबांनी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी महासमाधी घेतल्यानंतर पुढील तीन दिवसांत घडलेल्या अनेक ऐतिहासिक व दुर्मिळ घटनांची माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच साईंच्या महानिर्वाणानंतर जवळपास १८ वर्षे शिर्डीतील भक्तांची वर्दळ कमी झाली होती. त्या काळात साईबाबांच्या उपदेशांचा व विचारांचा प्रचार-प्रसार करून शिर्डीला पुन्हा जागतिक साईभक्तांचे श्रद्धास्थान बनविणाऱ्या तीन प्रमुख साईभक्तांच्या कार्याचाही या पुस्तकात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

साईभक्तांमध्ये 'साईंचे सोबती' या पुस्तकाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच त्याची द्वितीय आवृत्ती गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर प्रकाशित करण्यात आली आहे. पुस्तकाची मूळ किंमत ₹३५० असली तरी साईभक्तांसाठी ते विशेष सवलतीच्या दरात ₹२०० मध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून टपाल खर्च स्वतंत्र राहील. पुस्तक प्राप्त करण्यासाठी इच्छुक साईभक्तांनी लेखक रमेश भोळे यांच्याशी मो. 9323855055 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg