दोडामार्ग(प्रतिनिधी)- दोडामार्ग तसेच गोवा राज्यातून मोठया प्रमाणात खैराच्या झाडाची टस्करी केली जाते यात मोठया प्रमाणात रक्कम मिळते यामुळे दोडामार्ग तसेच गोवा राज्यात खैर चोरी करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. कसरई दोडामार्ग वनक्षेत्रात वन विभाग राञी गस्त घालत असताना झाडे कटिंग मशीन आवाज आल्याने वन विभाग यांनी सापळा लावून वाहनांसह काही जणांना ताब्यात घेतले. साडेतीन लाखांहून जास्त मुद्देमाल जप्त केला यातील एक जण फरार झाला. अशी माहिती दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांनी दिली. या कारवाई मुळे, खैरे झाडांची चोरी करणार्या टोळीत खळबळ उडाली आहे. दोडामार्ग वन विभाग यांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे. दिनांक ५/०८/२६ रोजी मौजे कसई वन सर्वे क्रमांक १७० मध्ये रात्रौ गस्त् करीत असता झाडे कापण्याच्या मशिनचा आवाज आल्याने त्या दिशेने जाऊन बॅटरीच्या दिशेने पाहणी केली असता पहाटे सुमारे साडेचार वा. सुमारास, तीन संशयित आरोपी दिसून आले. त्यातील दोन आरोपी फरार झाले असून आरोपी क्रमांक एक पांडुरंग महादेव गांवकर रा.उसप ता. डिचोली, गोवा व आरोपी क्रमांक दोन श्याम नवनाथ तुळसकर रा. नानोडा ता. डिचोली, गोवा यांना पकडण्यात आले.
सदर खैर माल नेणेसाठी आणलेले टाटा कंपनीचे डीआय वाहन क्रमांक GA06/T2775 तसेच लाल रंगाची पेंशन प्ल्स क्रमांक GA04/B-5653 व Super Steel इलेक्ट्रीक सायलेंट कटर -१ व जागेवरील खैर मालाची व बुडांची मोजमापे घेऊन बुडावर व जप् खैर मालावर जप्ती शिक्का SD-6 उमटवून सर्व मुददेमाल संरक्षणासाठी ताबेत घेतला, खैर नग ३८/१.४३९ घ.मी. माल किमंत २६७७३/- जप्त वाहने ३ अंदाजे किमंत ३०००००/- व कटर मशिन अंदाजे किमंत १५०००/- जप्त करणेत आला. मोबाईल नग ०३ अंदाजे किमंत ३००००/- असा एकंदर ३७१७७३/- किमंतीचा मुददेमाल ताब्यात घेतला. भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६ (१), डी, एफ, ४१(२) ब अन्वये मणेरी राऊंड गुन्हा क्रमांक सी ०७/२०२६ दिनांक ०५.०८.२०२६ अन्वये गुन्हा नोंद केला असून, फरारी आरोपी बाबत आरोपी क्रमांक १ व २ यांचेकडे चौकशी केली असता आरोपी क्रमांक ३ नितेश नारायण नाईक, रा. उसप ता. डिचोली, गोवा व आरोपी क्रमांक ४ किसन शशिकांत गांवकर रा. उसप ता. डिचोली, गोवा यांना दिनांक ०६.०८.२०२६ रोजी चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास चालू आहे.
सदरची धाडसी कारवाई ही उपवन संरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा स, यांचे मार्गदर्शनाखाली वैभव बोराटे सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी, संभाजी आनंदा पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग, तुकाराम सोपान हाक्के वनपाल मणेरी, शैलेश कांबळे वनरक्षक मणेरी, शुभम संभाजी वारके वनरक्षक, विश्राम बाबाजी कुबल वनसेवक मणेरी व जलद बचाव पथक दोडामार्गमधील बाबू वरक, जानू पटकारे, विलास खरवत यांनी पार पाडली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.