सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि मुंबई विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक यांनी भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह उपस्थित होते.
या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला विभागांतील विविध स्पर्धा पार पडणार आहेत. गायन, वाद्यवादन, लोकनृत्य, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, मिमिक्री, चित्रकला, रांगोळी, पोस्टर निर्मिती, कोलाज आणि मातीशिल्प अशा विविध स्पर्धांमधून विद्यार्थी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांना प्रोत्साहन देणारा प्रतिष्ठेचा उपक्रम मानला जातो. विभागीय फेरीतील उत्कृष्ट स्पर्धकांना मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी व कागदपत्र पडताळणी दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून करण्यात येणार आहे. मुख्य स्पर्धा दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० ते रात्री ९.३० या वेळेत पार पडतील. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी कथा लेखन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा दि. २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील पाटील, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि युवा महोत्सव समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या कार्यरत असून महोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.