रत्नागिरी : दहशत निर्माण करणार्या महापुराशी दोन हात करत चिपळूणवासियांना दिलासा देणार्या आणि वाशिष्ठी नदीच्या पात्रात साचलेल्या गाळाचा विळखा यशस्वीपणे दूर करणार्या रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या उल्लेखनीय कार्यावर शासनाने कौतुकाची मोहोर उमटवली आहे. सन २०२१ मधील विदारक पूरपरिस्थितीनंतर चिपळूण आणि परिसराचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी व भविष्यात असले नैसर्गिक संकट परतवून लावण्यासाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेले कठीण प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. याच धाडसी आणि नियोजनबद्ध कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे सन २०२२ चा प्रतिष्ठित ’सांघिक पुरस्कार’ रत्नागिरी पाटबंधारे मंडळ कार्यालयाला जाहीर करण्यात आला आहे.
या संपूर्ण कठीण काळात तत्कालीन सचिव जगदीश पाटील यांचे धोरणात्मक मार्गदर्शन, तत्कालीन अधीक्षक अभियंता आणि सध्या कोकण मुख्य अभियंता पदाची धुरा सांभाळणार्या वैशाली नारकर यांचे नेतृत्व तसेच जलसंपदा विभागाच्या संपूर्ण मेकॅनिकल (यांत्रिकी) टीमने दाखवलेले अभूतपूर्व तांत्रिक कौशल्य अत्यंत मोलाचे ठरले. चिपळूण येथे ओढवलेली पूरपरिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळत, वाशिष्ठी नदीच्या पात्रातून युद्धापातळीवर गाळ काढण्याचे मोठे आणि आव्हानात्मक काम या सर्व टीमने यशस्वीपणे पूर्ण केले. या तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजनांमुळे केवळ पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला नाही, तर भविष्यातील पूर नियंत्रणासाठी एक कायमस्वरूपी आणि शाश्वत सुरक्षाकवच तयार झाले.
शासनाकडून जाहीर झालेला हा पुरस्कार म्हणजे केवळ एका प्रशासकीय कामगिरीचा गौरव नसून, संकटाच्या काळात जनहितासाठी अहोरात्र झटणार्या कर्तबगार अभियंत्यांच्या आणि मेकॅनिकल टीमच्या जिद्दीची आणि दृढसंकल्पाची पावती आहे. वैशाली नारकर, जगदीश पाटील आणि संपूर्ण मेकॅनिकल टीमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रत्नागिरी मंडळाने दाखवलेले हे कौशल्य संपूर्ण कोकण विभागासाठी प्रेरणादायी ठरले आहे. जलसंपदा विभागाच्या या मानाच्या पुरस्कारामुळे संपूर्ण कोकण खोर्यातील अभियंत्यांच्या व कर्मचार्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा राज्यपातळीवर गौरव झाला असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.