सावंतवाडी- विभागीय वनाधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकण अलिबाग, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली "जागतिक कांदळवन संवर्धन दिन" चे औचित्य साधून मौजे उभादांडा येथील मानसीश्वर देवस्थान नजीकच्या कांदळवन क्षेत्रात श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्या प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. तसेच मांडवी खाडी वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांसोबत कांदळवन ट्रेल आयोजित करण्यात आली. याठिकाणी परिमंडळ वनाधिकारी सुनील सावंत यांनी जागतिक कांदळवन संवर्धन दिनाच्या अनुषंगाने खाडी क्षेत्रात आढळणारे कांदळवनाचे पर्यावरणातील महत्त्व, कांदळवनाचे महत्त्व, कांदळवनाला असणारे धोके आणि नियम याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले व कांदळवाचे संवर्धन व संरक्षणाचे आवाहन केले.
तसेच कांदळवन ट्रेल च्या माध्यमातून स्वामिनी महिला बचत गटातील सदस्यांनी कांदळवन व पक्षी प्रजाती, तसेच त्यांचे आयुर्वेदिक उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीचे प्रा.डॉ. गणेश मर्गज, डॉ. शलाका वालावलकर, प्रा. तन्वी नाईक, प्रा. श्वेता जाधव, प्राणीशास्राचे विद्यार्थी, तसेच कांदळवन प्रतिष्ठानचे, वनरक्षक अजित भोसले, वनमजूर गौरेश खडपवर, कांदळवन प्रतिष्ठान व यु. एन. डी. पी. (जी. सी. एफ) प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक दिगंबर तोरस्कर, जागृती गवंडे, सौरभ राऊळ, शुभम कांबळे, युगंधरा कांबळे, सुकृती नाईक आदी उपस्थित होते.
स्वामिनी महिला गटाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती त्यांचे उपयोग व त्यांचे महत्त्व या संदर्भात माहिती दिली. याप्रसंगी परिमंडल वनाधिकारी सुनील सावंत यांनी कांदळवन संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. कांदळवन यांचा विस्तार उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशापुरता मर्यादित असून जगभरात 118 देशांमध्ये 1,37,766 चौरस किलोमीटर क्षेत्रात ती आढळतात.



























































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.