loader
Breaking News
Breaking News
Foto

एलटीटी स्कूलमध्ये शिक्षक कार्यशाळेचे आयोजन

खेड : येथील खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल. टी. टी. इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्यु. कॉलेज, खेड या प्रशालेत रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी 'शिक्षक कार्यशाळे' चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले सोनाली नाम्बीयार मॅडम, भक्ती वैद्य, संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, माजीद खतीब, समन्वयक जॉय, समन्वयक एल्सी, मुख्याध्यापक जी. बी. सारंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी. सी. कुडाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत होणारे बदल, त्या नाविण्यपूर्ण बदलांचा शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात व शालेय अध्यापनात अवलंब करून शिक्षकांना अध्यापनदृष्ट्या सक्षम बनविणे हा सदर कार्यशाळा घेण्यामागचा हेतू आहे. या नवीन अध्यापन पद्धतीनुसार मार्गक्रमण करणे ही काळाची गरज आहे. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शिका म्हणून लाभलेल्या सोनाली नाम्बीयार यांनी आपल्या उत्कृष्ट संवाद कौशल्याद्वारे शिक्षकांनी अध्यापन करताना आत्मसात करावयाच्या गोष्टी विविध मुद्द्यांच्या व प्रात्यक्षिकाच्या आधारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पष्ट केल्या.

टाईम्स स्पेशल

शेवटी शिक्षकांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाविषयी आपले मत मांडताना या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या अध्यापनात खूपच फायदा होणार असल्याचे सांगितले. याप्रकारच्या आणखी नऊ सत्राचे आयोजन यापुढेही करण्यात आले आहे. सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सिद्धी पाटणे यांनी केले. तर आभारप्रदर्शन एल्सी मॅडम यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg