संगमेश्वर / सत्यवान विचारे : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या साऊथ कोकण विभागीय स्पर्धांचे आयोजन लांजा येथील महाविद्यालयात उत्साहात पार पडले. या महोत्सवात संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. मात्र, स्पर्धेच्या निकालानंतर अनेक ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी मूल्यमापन प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली असून, उत्कृष्ट सादरीकरण करूनही योग्य स्थान न मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
युवा महोत्सव हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणारा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. या स्पर्धांसाठी अनेक महाविद्यालयांनी महिनोनमहिने विद्यार्थ्यांकडून कठोर सराव करून घेतला होता. विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी दर्जेदार सादरीकरण केले. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उत्कृष्ट सादरीकरणांना अपेक्षित स्थान मिळाले नसल्याचा आरोप सहभागी महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी केला आहे. काही स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय क्रमांक जाहीर न केल्याची चर्चा सहभागी विद्यार्थ्यांमध्ये रंगली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा हिरमोड झाल्याचे सांगितले जात आहे. मेहनतीनंतरही न्याय्य मूल्यमापन झाले नसल्याची भावना विद्यार्थी, प्रशिक्षक आणि प्राध्यापकांमध्ये निर्माण झाली आहे.
त्यामुळे स्पर्धेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काही प्राचार्यांनी संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेची माहिती मागवून वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. स्पर्धांचे परीक्षण अधिक पारदर्शक व्हावे, परीक्षकांनी दिलेल्या गुणांची माहिती उपलब्ध करून द्यावी तसेच सर्व सहभागी महाविद्यालयांना समान न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाने दखल घेऊन निकाल व मूल्यमापन प्रक्रियेची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी, अशी अपेक्षा सहभागी महाविद्यालये, विद्यार्थी आणि प्राध्यापक व्यक्त करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य न्याय मिळावा आणि युवा महोत्सवावरील विश्वास कायम राहावा, यासाठी विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.