loader
Breaking News
Breaking News
Foto

दिव्यांग नागरिकांसाठी लांजा येथे 13 ऑगस्ट रोजी शिबीर

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - रत्नागिरी जिल्हा रुग्णालय वतीने दिव्यांग नागरिकांसाठी विशेष दिव्यांग शिबिराचे आयोजन गुरूवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरात दिव्यांग नागरिकांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचाराबाबत सल्ला देण्यात येणार आहे. शिबिरासाठी मानसोपचार तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ तसेच भौतिकोपचार तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहेत.

टाईम्स स्पेशल

दिव्यांग नागरिकांना विविध वैद्यकीय अडचणींबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असून, पात्र दिव्यांग नागरिकांनी शिबिरात उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.विटेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg