loader
Breaking News
Breaking News
Foto

शंभर एकरात काजूची लागवड करणाऱ्या भेडशी येथील चंदनराज टोपले यांचा आम. दिपक केसरकर यांच्या हस्ते गौरव

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - शेतकरी ते छोटा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते असा प्रवास करत शेती बागायतीवर लक्ष केंद्रित करत शंभर एकर क्षेत्रात भाऊसाहेब फुंडकर योजना अंतर्गत काजू लागवड करणाऱ्या भेडशी येथील युवा उद्योजक चंदनराज सुर्यकांत टोपले यांचा नुकताच एका कार्यक्रमात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आम. दिपक केसरकर यांच्या हस्ते विशेष गौरव करून सन्मानित करण्यात आले. चंदनराज टोपले यांचे भेडशी परिसरात कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील चंदनराज टोपले यांनी आपल्या विसाव्या वर्षी शेती तसेच छोटे छोटे व्यवसाय यावर भर दिला. एकीकडे युवा पिढी शेती बागायतीत काय मिळतेय? कशाला हवीय शेती ? असे म्हणत नोकरीच्या शोधात फिरतानांचे विदारक दृश्य आपण पाहतो. मात्र भेडशी येथील युवा उद्योजक असणारे चंदनराज सूर्यकांत टोपले यांनी भाऊसाहेब फुंडकर योजनेचा लाभ घेत दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या विर्डी गावात १०० एकर क्षेत्रात काजू लागवड करत युवकांनी शेती बागायतीकडे वळण्याचा संदेश दिला आहे.

टाईम्स स्पेशल

चंदनराज टोपले यांच्या या काजू लागवडीची दखल छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात घेण्यात आली. कृषी विभागाच्या मार्फत माजी शालेय व शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याहस्ते चंदनराज टोपले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भेडशी येथील चंदनराज टोपले युवा उद्योजक म्हणून शासकीय ठेकेदार, तसेच बिल्डिंग क्षेत्रात पाऊल टाकले आहे. शिवाय मेडिकल औषध दुकानमध्ये शिरकाव केला. इतर व्यवसाय देखील सुरू आहेत. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी या व्यापारी पेठेतील सुपुत्र असूनही चंदनराज टोपले यांनी १०० एकर क्षेत्रात केलेली लागवड आणि त्यातून दिलेला युवाईला रोजगाराचा संदेश कौतुकास्पद आहे. यावेळी विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg