loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील मोकाट जनावरांची चिपळूणच्या गोशाळेत रवानगी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरात त्रासदायक ठरणार्‍या पकडलेल्या २५ उनाड जनावरांची रवानगी नगरपंचायतीने अखेर चिपळुण येथील गोशाळेत केली आहे. गुरे मालकांच्या असहकार्य भूमिकेमुळे नगरपंचायत प्रशासनाकडून नाईलाजास्तव हा कठोर निर्णय घेतला आहे. लांजा शहर परिसरातील नागरीकांची गुरे मोकाटपणे बाजारपेठेत, महामार्गावर बिनधास्तपणे बसून रहातात. या जनावरांचा उपद्रव हा बाजारपेठेतील व्यापारी, नागरीक, विद्यार्थी, महामार्गावर प्रवास करणारे वाहन चालक यांना सहन करावा लागत असून जनावरापासून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. दिवसेंदिवस उनाड जनावरांचा उपद्रव वाढला होता. मालकांनी जनावरे सोडू नयेत बंदोबस्त करावा, असे आवाहन नगरपंचायतच्या वतीने घंटागाडी द्वारे करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र गुरे मालकांकडून जनावरांचा बंदोबस्त केला गेला नाही. नगरपंचायतीकडून जनावरांची धरपकड करून मालकांच्या ताब्यात ही देण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा गुरे बाजारपेठेत येत असल्याचे दिसुन आले. या संदर्भात लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, आणि मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार कर्मचार्‍यांनी बाजारात फिरणार्‍या २५ गुरांची पकड केली होती. सदर गुरे नगरपंचायतीच्या सभागृहाच्या ठिकाणी बांधून ठेवली होती. चारापाणी घालून आठ दिवस गुरांना सांभाळण्यात आले. तसेच संबधित मालकांना गुरे घेऊन जाण्यासाठी आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

नोटीस बोर्ड वर सूचनाही देण्यात आली होती. मात्र मालकांच्या असहकार्य भूमिकेमुळे नगरपंचायतीने कठोर निर्णय घेऊन पकडलेल्या जनावरांची रवानगी गोशाळेत केली आहे. यापुढे आपली जनावरे बाजारात फिरणार नाहीत याची काळजी मालकांनी घ्यावी आणि नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष,व उपनगराध्यक्ष यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg