सावंतवाडी - दि. २ ऑगस्ट रोजी आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात संपन्न झालेल्या 'आंबोली मान्सून मॅरेथॉन' स्पर्धेत पाच किलोमीटर गटात सैनिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला, आणि ५ किमी गटात दहा पैकी एकूण सहा क्रमांकाची बक्षीसे प्राप्त करून स्पर्धेत सैनिक स्कूलचे वर्चस्व सिद्ध केले. दाट धुकं, मुसळधार पाऊस, बोचरी थंडी आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आंबोली या ठिकाणी आज सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप 'आंबोली- सांगेली' आणि सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६' मोठ्या उत्साहात संपन्न झाली. निसर्गाची किमया आणि साहसी क्रीडा यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी स्थानिकांसह परराज्यांतील तब्बल ७०० हून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता.
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे 'प्लास्टिक मुक्त आंबोली आणि प्लास्टिक मुक्त सिंधुदुर्ग' हा सामाजिक संदेश होता. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये सैनिक स्कूलचे विद्यार्थी हे प्रमुख आकर्षण बनले होते. 'शारीरिक क्षमता' आणि शिस्त' यांच्या सुरेख ताळमेळाच्या जोरावरती सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण मॅरेथॉनचे सौंदर्य वाढवले आणि उपस्थितांच्या मनावर विजय मिळवला. मॅरेथॉन स्पर्धेत पाच कि.मी. गटात प्रथम- कॅडेट अथर्व देसाई, द्वितीय- कॅडेट रुद्र आपटे, तृतीय-कॅडेट विघ्नेश वातकर, पाचवा कॅडेट भूमिक राऊत, सातवा कॅडेट रुद्र पाटील, नववा- कॅडेट देवेश परब आणि दहावा- कॅडेट अर्जुन कामटी आणि कॅडेट देवेश मुद्रस यांनी अनुक्रमे विजय मिळवला.
विजेत्या स्पर्धकांना सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, भाजप नेते प्रभाकर सावंत, विशाल सेवा फाउंडेशन अध्यक्ष विशाल परब, पंचायत समिती सदस्य मायकल डिसूझा, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सर्व धावपटूंचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष सुनिल राऊळ, सचिव जॉय डॉन्ट्स, सर्व संचालक मंडळ, कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे, सर्व सैनिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.