खेड, प्रतिनिधी : कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाऊंडेशन, खेड (रजि.) यांच्या वतीने खेड तालुक्यातील अस्तान येथील अंगणवाडी केंद्रात गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वडील व आई नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन म्हणून वही व पेन, तर अंगणवाडीतील चिमुकल्यांना पाटी, पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अस्तान ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच ऋषिकेश मोरे, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे माजी सरचिटणीस श्रीकांत सकपाळ, बौद्धजन विकास मंडळ अस्तान ग्रामस्थ व मुंबईचे माजी अध्यक्ष प्रकाश जाधव, अंगणवाडी सेविका समृद्धी सागवेकर, सहकारी उषाताई चव्हाण तसेच आशा सेविका तांबे यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने एकत्र येत अशा सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे सहदेव मोहिते, विनोद मस्के, दिलीप सकपाळ, धिरज खेडेकर, मंगेश मोरे, सुनिता कांबळे, नवनाथ खाते आणि श्रीकांत सकपाळ यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, पत्रकार तथा संपादक अनिल पांडुरंग येसोंडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.


















































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.