loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेश चित्रशाळा गजबजल्या; मुर्त्या साकारण्यात मूर्तिकार मग्न

मालवण (प्रतिनिधी) - कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थी सणाला अवघा एक महिना शिल्लक राहिला असून गणपती बाप्पाच्या मुर्त्या घडविण्यासाठी गणेश चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मालवण मध्ये देखील विविध गणेश चित्रशाळांमध्ये गणेशभक्तांच्या आवडीनिवडीनुसार विविध आकार, उंची आणि देखव्याच्या मुर्त्या साकारण्यात गणेश मूर्तिकार व त्यांचे सहकारी मग्न झाले आहेत. तर यावर्षी शाडूच्या मातीच्या दरात व रंगांच्या दरात २० ते २५ टक्क्यानी वाढ झाल्याने त्याचा परिणाम गणेश मुर्त्यांच्या दरातही होणार आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव कोकणातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या सणामध्ये कोकणातील कलाकारांनी घडविलेल्या गणपती बाप्पाच्या सुबक व आकर्षक मुर्त्या प्रमुख आकर्षण असतात. अनेक वर्षांची परंपरा जोपासत आणि पिढ्यानं पिढ्या चालत आलेली कला जोपासत येथील मूर्तिकार गणपती घडवत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यात देखील कोकणात शाडूच्या मातीच्या मुर्त्यांना आजही मोठी पसंती दिली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गणेश चतुर्थी सणाला आता अवघा एका महिना शिल्लक राहिला असल्याने गणेश चित्रशाळांमध्ये लगबग वाढली आहे. मालवण मधील गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या आहेत. गणेश भक्त आपल्या हव्या तशा मुर्त्या निवडत आहेत तर काही जणांना ज्या पद्धतीच्या मुर्त्या सांगितल्या तशा मुर्त्या घडविण्यासाठी मूर्तिकार आपले कसब पणाला लावत आहेत. गणरायाच्या श्रद्धेत तल्लीन होऊन आणि गणराया चरणी आपली कला सेवा अर्पण करून मूर्तिकार व त्यांचे सहकारी मुर्त्या घडवीत आहेत. मुर्त्या बनविण्यासाठी आवश्यक शाडू मातीच्या दरात यावर्षी २० टक्के वाढ झाली आहे, तर रंगांच्या दरातही २० ते २५ टक्के एवढी वाढ झाल्याचे मूर्तिकार सांगतात. बहुतांश गणेश भक्तांचा कल हा शाडू मातीच्या मुर्त्या बनवून घेण्याकडे असून काही भक्तांकडून पीओपीच्या मुर्त्या सांगितल्या जात आहेत. तर काही भक्तांकडून उंदीर, मोर, शंख यांच्यावर बसलेला गणराया तसेच दत्त, स्वामी समर्थ यांच्यासह विविध रूपातील गणेश मुर्त्याही सांगितल्या जात आहेत.

टाईम्स स्पेशल

गणेश चित्रशाळांमध्ये मूर्तिकारांना अनेक तरुण व युवा मंडळीही मूर्तिकाम व रंगकाम करण्यासाठी सहकार्य करत आहेत. यामध्ये मुलीही सहभागी होत आहेत. सध्याच्या आधुनिक युगात मातीपासून मूर्ती साकारण्याची कला जिवंत राहण्यासाठी युवा मंडळींनी मूर्तीकामात अधिकाधिक रस घेऊन सहभाग घेणे गरजेचे आहे, असे मत मूर्तिकारांमधून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg