loader
Breaking News
Breaking News
Foto

एल निनोच्या पार्श्वभूमीवर जांभूळनगर गट शेतीला गादीवाफ्यावरील सामूहिक रोपवाटिकेने तारले

मंडणगड (प्रतिनिधी) : पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप 2026 स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील जांभूळ नगर येथील शेतकऱ्यांनी गट शेती करण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून अतिशय उत्साहाने हा गट शेती कामात कार्यरत आहे. यावर्षी गटातील सदस्यांनी पडीक जमिनीवर सुमारे 10:30 एकर क्षेत्रावर भात पीक लागवड केलेली आहे. हे येथील शेतकऱ्यांचे खरे यश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणी फाउंडेशन, कृषी विभाग व उमेद यांच्या मार्गदर्शनाखाली हा गट बियाणे निवडीपासून तर कापणी पर्यंत दिलेल्या एस ओ पी पूर्ण करणेचे उद्देशाने स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. कोणत्याही प्रकारची भाजावळ न करता गादीवाफ्यावर केलेली भात रोपवाटिका व त्यासाठी जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया तसेच विशेष करून गोकृपा अमृतम याचा रोपवाटिकेत केलेला वापर त्याचा सदृश्य परिणाम पंचक्रोशीतील इतर शेतकऱ्यांना पाहण्यासाठी व चार सूत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी पाणी फाउंडेशन फिल्ड आफीसर प्रिया गमरॆ, सुहास मोहीतॆ आणि मंडणगड तालुका कृषी आधिकारी सोमनाथ आहेरकर, उप कृषी अधिकारी सचिन पवार सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकांत कोठाळे, नागरगोजे, तळेकर उपस्थित होते. तसेच गटातील सर्व सदस्य त्याचप्रमाणे हा अनोखा आणि प्रयोगशील शेती प्रत्याक्षिक पाहण्यासाठी जांभूळ नगर पंचक्रोशीतील सर्व प्रगतीशील शेतकरी, महिला, तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg