रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या कोतवडे (खरवते) येथील साहाय्यक अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गावात काही काळापूर्वी भूमिगत विद्युत वाहिनीचे (अंडरग्राउंड केबल) काम करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे त्यातील काही वाहिन्या जमिनीच्या वर आल्या आहेत, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, बसवण्यात आलेले डीपी बॉक्स पडण्याच्या स्थितीत असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या गणेशोत्सवाचा काळ जवळ आल्याने गावात गणपती मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने सुरू आहेत, ज्यांना सुरळीत वीजपुरवठ्याची तीव्र आवश्यकता आहे. याशिवाय, गावात मोठ्या प्रमाणावर मच्छिमार व्यावसायिक असून वीज नसल्यामुळे त्यांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन वीज वितरण कंपनीने तातडीने गावाची पाहणी करावी आणि योग्य ती कार्यवाही करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महेश मनोहर मयेकर, विनय शशिकांत मयेकर, संदेश देवाजी बनव, प्रतिक चंद्रकांत नार्वेकर, समीर अशोक शेट्ये, समिक्षा समीर शेट्ये, अनिकेत रमेश वाटेकर, प्रणव गणेश वारेकर, खलील गाठीकोल, विवेक विजय मयेकर आणि उद्देश शंकर कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. या निवेदनाची प्रत नाचणे रोड येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही पाठवण्यात आली आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.