loader
Breaking News
Breaking News
Foto

बाणकोट वेळास मार्गाला संरक्षक भिंतीची प्रतिक्षा

मंडणगड(प्रतिनिधी)- बाणकोट वेळास या २ गावांना जोडणार्‍या मार्गावर एका बाजूला अरबी समुद्र आहे. या अरबी समुद्राला आलेल्या भरतीच्या उधाणाचे पाणी हे रस्त्यावर उलटते तसेच पावसाळ्यात सावित्री नदीला पूर आल्यावर हा रस्ता अनेकदा पाण्याखाली जातो. त्यामुळे कित्येकवेळा एस.टी. बसेसही बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर येते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या रस्त्याला समुद्राच्या बाजूने संरक्षणासाठी धुप प्रतिबंधक बंधार्‍याची खरी गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गाव असलेल्या बाणकोट आणि वेळास या २ गावांना जोडणारा रस्ता हा पर्यटन आणि व्यापारी वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. वेळास गावाला कासवाचे गाव ओळखले जाते.पर्यटक या गावात मोठ्या प्रमाणात येत असतात तसे बाणकोट येथे असलेल्या ऐतिहासिक हिम्मतगड अर्थातच बाणकोट किल्ल्यामुळे येथे पर्यटकांची कायमच मांदियाळी असते. अशा या मार्गावर वेळास तसेच वेळासबाजूकडील खार, साखरी, आंबवली तसेच बाणकोटकडील वेसवी, उमरोली, वाल्मिनगर येथील लोक या ना त्या कामाच्या निमित्ताने बाणकोट असेल वा वेळासकामानिमित्त सतत ये-जा करत असतात. त्यातच दररोज शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी वेळासमधील विद्यार्थी हे मंडणगड, बाणकोट वा वेसवीत येत असतात. बेसवी आणि बाणकोट येथे बँका असल्याने येथील रहीवासी दररोज आपल्या आर्थिक देव घेवींचे व्यवहार करण्यासाठी बँकांमध्ये येत असतात; तर काहीवेळा पोलीस ठाण्याशी संबंधित कामे करण्यासाठी वेसवी येथे असलेल्या बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात लोकांना यावे लागते.

टाइम्स स्पेशल

अशा मार्गावर पावसाळ्यात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यावर अथवा उधाणाच्या भरतीचे पाणी हे रस्त्यावर उलटल्यावर या मार्गावर वाहतुकीला अडथळा होवून या म गर्गावरून प्रवास करणार्‍यांची चांगलीच गैरसोय होते. कोणाही प्रवास करणान्या मग ते पर्यटक असुदेत नाही तर येथील स्थानिक वा विद्यार्थी असुदेत. यांची गैरसोय होवू नये, यासाठी या मार्गावर समुद्राच्या बाजूने संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg