वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील गाजलेल्या विश्वास खरे खून प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर हा गुन्हा शाबीत करण्यासाठी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे काम करणाऱ्या गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल आशिष शिंदे यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. गु.र.न. ६७/२०१४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३९४ व ३४ अन्वये दाखल असलेल्या प्रकरणाचा सेशन केस क्रमांक १४/२०२० असा होता.
या खटल्यात आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे (वय ३७, रा. बोफखेल, खडकी, पुणे) आणि किरण रामदास कुचेकर (वय ३४, रा. उत्तमनगर, वारजे, माळवाडी, पुणे) यांच्याविरोधात सरकार पक्षाने ठोस पुरावे व प्रभावी मांडणी केल्याने न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या उल्लेखनीय यशाबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र चंद्रकिशोर मीणा यांच्या हस्ते रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुणी तसेच चिपळूण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक सचिन सावंत व पो.हे.कॉ. आशिष शिंदे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या गौरवामुळे गुहागर पोलीस ठाण्याच्या तपासकौशल्याची आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी समन्वय साधण्याच्या क्षमतेची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली असून, पोलीस दलातही या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.