loader
Breaking News
Breaking News
Foto

मोदींचा व्हिडीओ हटविल्याबद्दल मेटाने माफी मगितली , काय कारण दिले. ?

नवी दिल्ली : गेल्या काहीं दिवसांपासून चर्चेचा ठरलेला मुद्दा आता सुटताना दिसतोय ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवण्यात आल्यानंतर 'मेटा'ने (Meta) सरकारची माफी मागितली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत, कंपनीचे 'ग्लोबल अफेअर्स' प्रमुख जोएल कॅप्लन यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या पोस्टवर घालण्यात आलेले निर्बंध ही एक तांत्रिक चूक होती आणि त्यांनी मेटाच्या वतीने याबद्दल खेद व्यक्त केला. या घटनेनंतर, सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या उत्तरदायित्वाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मेटा'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधी माहिती तंत्रज्ञान (IT) सचिव एस. कृष्णन आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २३ जुलैची फेसबुक पोस्ट काढून टाकण्यात आल्याचा विषय. याच पोस्टमध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. नंतर 'मेटा'ने ती पोस्ट पुन्हा बहाल केली आणि ती पोस्ट काढून टाकली जाण्यामागे त्यांच्या 'एआय' (AI) आधारित प्रणालीतील तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg