देवगड(प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा पाटथर (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध वजनगटांमध्ये पदके पटकावत विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक उंचावला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात २५ किलो वजनगटात कल्पित कविश्वर साईम याने तृतीय क्रमांक मिळविला. ३० किलो वजनगटात सार्थक मारुती परब याने तृतीय क्रमांक पटकावला, तर ४० किलो वजनगटात मुलराज अमित परब यानेही तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात २७ किलो वजनगटात आर्या विठोबा परब, ३२ किलो वजनगटात मृणाली अजीत कदम आणि ४० किलो वजनगटात श्रावणी श्रीराम परब यांनी तृतीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती झुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश मिळविले.
या यशाबद्दल कुणकेश्वर केंद्राच्या केंद्रप्रमुख देवकी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश कदम, उपाध्यक्ष स्नेहा कदम, शिक्षक जांभवडेकर, दराडे तसेच पालकांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून, पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पाटथर परिसरात आनंदाचे वातावरण असून, शाळेच्या क्रीडा परंपरेत आणखी एका उल्लेखनीय यशाची नोंद झाली आहे.





































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.