संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - श्री संत सीताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण, ता. चिपळूण यांच्या वतीने समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रमांतर्गत ह.भ.प. आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालय, नायशी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे मोफत वाटप करण्यात आली. श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय तसेच श्री संत सीताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि समाज हितासाठी विविध लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
शालेय परिपाठादरम्यान विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुमित रघुनाथराव चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने शैक्षणिक साहित्याचा स्वीकार करत ट्रस्टच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक खंडू नवले यांनी ट्रस्टच्या या उपक्रमाचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, ट्रस्टचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मुख्याध्यापक सिद्राया उत्तरे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आली उपस्थित होते. ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक उत्साहाने करण्यास मदत झाली असून, शिक्षणाबरोबरच समाजसेवेची मूल्ये रुजविण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.