loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात पी. जी. पाटील यांचा सन्मान

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.जी. पाटील यांचा गुरूपौर्णिमेनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, संचालक प्रमोद लक्ष्मण मोहिते, माजी संचालक के. बी. गांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. परब व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना पी.जी. पाटील व त्यांचे सहकारी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेस ४४ वर्षे झाली आहेत. या संस्थेमुळे अनेक कुटूंबांना रोजगार उपलब्ध झालेला आहे, अपार कष्ट करून हि संस्था स्थापन करणाऱ्या गुरूतुल्य व्यक्तीचा सन्मान करावयास मिळणे हे अभिमानास्पद आहे, असे सांगितले. यावेळी प्रमोद लक्ष्मण मोहिते, के. बी. गांवकर यांनीही विचार मांडले.

टाईम्स स्पेशल

या सत्कारास उत्तर देताना संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील यांनी संस्थेतर्फे गुणगौरव करण्यात आल्या बद्दल आभार मानले, तसेच संस्थेच्या प्रगतीचे आणि विद्यमान संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक करत आपले संस्थेला सहकार्य राहील, असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg