मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर तालुक्यात कार्यान्वीत असलेल्या फिरती प्रयोगशाळे मार्फत निवडक प्रा.शाळेतून दरमहा प्रयोग दाखवले जातात. उपलब्ध साहित्यांने छोट्याछोट्या प्रयोगातून निरीक्षणाने निष्कर्ष काढून फिरती विज्ञान प्रयोगशाळा या संधीचा मुलांनी फायदा घेऊन वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा अशा प्रकारचे मार्गदर्शनीय मनोगत या प्रकल्प समितीचे सदस्य व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये यांनी चिपळूण तालुक्यातील शाळा कुशिवडे नं.१ आगवे नं.१ येथे कार्यान्वीत करण्यात आलेल्या फिरती विज्ञान प्रयोगशाळा या शुभारंभ प्रसंगी विचार व्यक्त केले. ते मुलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सेवा भारती कोकण प्रांत, ट्रस्ट फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प संगमेश्वर जिल्हा दक्षिण रत्नागिरी अंतर्गत गेली एकोणीस वर्षे संगमेश्वर तालुक्यात २१ जि.प.च्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी वर्गातील मुलांना सामान्य प्रयोगांतून अपेक्षित योग्य व उपलब्ध साहित्य, कृती, प्रात्यक्षिक निरीक्षण, निष्कर्ष, इ. अशा गोष्टींची सवय लागून, त्यातून सत्यता पडताळणे, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जावा व असे अनेक हेतू सफल होऊन मुलांचे विज्ञानवादी विचार तयार व्हावेत. यामुळे सदरची फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहे. याशिवाय शिक्षण, स्वावलंबन, संस्कार, व्यक्तीमत्व विकास, आरोग्य अशा समाविष्ट उपक्रमांचा यामध्ये उल्लेख असल्याचे पटवून दिले. याच धर्तीवर चिपळूण तालुक्यातील शाळा कुशिवडे नं. १ व शाळा आगवे नं. १ याशाळांतून फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, सदर कामी संबंधित प्रयोगशाळेचे प्रशिक्षक दिलीप काजवे दरमहातून पूर्ण एक दिवस प्रत्येक शाळेत पूर्व नियोजनाने उपस्थित राहणार आहेत.
कुशिवडे येथे हवेचे गुणधर्म, हा प्रयोग दाखवून तर आगवे येथे मनोरंजक गीताने या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित प्रकल्प प्रमुख रामचंद्र निकम, प्रशिक्षक दिलीप काजवे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन हेतू स्पष्ट केला. तसेच नांदगाव हरहुन्नरी केंद्र प्रमुख संचिता सावर्डेकर यांनी याप्रसंगी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पांतर्गत फिरती विज्ञान प्रयोगशाळा यासाठी येथील मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, चिपळूण गटशिक्षणाधिकारी यांनी उत्तम प्रकारचे सहकार्य लाभले. या प्रसंगीं शाळा कुशिवडे मुख्याध्यापक विजय जगताप, पद्मजा राऊत, शा. व्य. समिती अध्यक्षा. मानसी गोसावी, योगेश गोराडे, महेंद्र तेटांबे, आगवे नं.१ शाळा मुख्याध्यापिका शुभदा चाळके, फाईमा कापडी, तृप्ती रंगाटे, रामचंद्र नांदिवडेकर, शा.व्य. समिती अध्यक्षा संजना भुवड, सदस्या आशा सुर्वे, आदी. उपस्थित होते व यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय जगताप व रामचंद्र नांदिवडेकर यांनी उत्तम रीतीने केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.