सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता अबाधित राहील का? मायनिंग, अवैध मायनिंग आणि शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प येथील निसर्गासाठी कसे कायमस्वरूपी धोकादायक ठरतील, यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांच्या संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली. शनिवार, २५ जुलै रोजी आंबोली-चौकुळ येथील रिसॉर्टमध्ये 'डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब'तर्फे एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत वैद्यकीय विषयांवरील व्याख्यानांबरोबरच "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता आणि त्यासमोरील आव्हाने" या विषयावर एक महत्त्वपूर्ण परिसंवाद पार पडला.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन व निवेदन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, "सिंधुदुर्गातील निसर्ग अतिशय दुर्मिळ आणि संवेदनशील आहे. असा जैवविविधतेने नटलेला निसर्ग तयार होण्यासाठी अडीच हजार वर्षे लागतात. हा प्रदेश जगातील ३६ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक असून संपूर्ण भारतासाठी एक अमूल्य ठेवा आहे." संजय सावंत (जिल्हा वन्यजीव रक्षक): तिलारी क्षेत्रात पट्टेरी वाघांचे बारमाही अस्तित्व आणि गेल्या काही वर्षांत विकसित होत असलेल्या व्याघ्र प्रजनन स्थळाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
भाग्यश्री परब (पक्षीतज्ज्ञ): जिल्ह्यात पूर्वी २५० पक्षांच्या प्रजाती आढळत होत्या, आता तो आकडा ४०० च्या पार गेला आहे. मात्र, बेसुमार वृक्षतोडीमुळे या दुर्मिळ पक्षांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. हेमंत ओगले व डॉ. दत्तप्रसाद सावंत (संशोधक): १६०० किमीच्या पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा आढावा घेत, आंबोली-चौकुळ परिसरातील फुलपाखरांच्या प्रजातींवर प्रकाश टाकला. तसेच चौकुळ येथे शोधलेल्या 'चतूर' (Dragonfly) कीटकाच्या नव्या प्रजातीची माहिती दिली. एम.डी. कम्युनिटी मेडिसिनचे शिक्षण घेतलेल्या डॉ. सावंत यांनी सांगितले की, संपूर्ण श्रीलंका देशात जेवढ्या चतूर कीटकांच्या प्रजाती आहेत, तितक्या एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात. काका भिसे (जैवविविधता अभ्यासक): पर्यटन, शासकीय धोरणे आणि निसर्गावर येणारी संकटे यावर मार्गदर्शन करताना जैवविविधता रक्षणाची गरज अधोरेखित केली. या परिसंवादात मायनिंग, अवैध मायनिंग आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग यांसारख्या विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या दूरगामी व विनाशकारी परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित डॉक्टरांनी हा परिसंवाद अतिशय उद्बोधक व माहितीपूर्ण असल्याचे सांगत, असे उपक्रम जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.