संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - शासकीय रुग्णालयात केसपेपरपासून सर्व वैद्यकीय उपचार अगदी मोफत मिळतील अशा पोकळ घोषणांचा सुकाळ करत शासनकर्ते आणि प्रशासन स्वतःची ततारी वाजवत आहेत. मात्र, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील विदारक आणि चीड आणणारे वास्तव पाहिले, तर शासनाचे हे दावे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार ठरत आहे. एका बाजूला मोफत सेवेची बोगस गाजरे दाखवून प्रसिद्धीचा स्टंट करायचा आणि दुसरीकडे जनतेच्या घामाच्या पैशातून आणलेले लाखो रुपयांचे अत्याधुनिक सोनोग्राफी उपकरण गेल्या अनेक वर्षांपासून एका बंद खोलीत डांबून सडत ठेवायचे, असा निगरगट्ट कारभार शासनकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यांदेखत उघडपणे सुरू आहे. हे महागडे वैद्यकीय उपकरण आणून वर्ष उलटली तरी ते चालवण्यासाठी आवश्यक असलेला प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात शासन आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
मग प्रश्न असा उपस्थित होतो की, जर तंत्रज्ञच द्यायचा नव्हता, तर मग जनतेच्या करातील कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्याचा हा बनाव नक्की कोणाच्या भल्यासाठी रचला गेला? फक्त खरेदी दाखवून स्वतःची तुस भरण्यासाठी आणि कमिशनचे खिसे गरम करण्यासाठीच जनतेच्या पैशांची ही दरोडेखोरी करण्यात आली होती का? हा सर्व सावळागोंधळ शासनकर्ते आणि प्रशासनाच्या लाजीरवाण्या संगनमताने जाणीवपूर्वक चालवला जात असल्याचा थेट आणि जळजळीत आरोप आता संतप्त रुग्णांमधून केला जात आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय हे मुंबई-गोवा या अतिरहदारीच्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित असल्याने येथे दररोज अपघातग्रस्त, तातडीच्या उपचारांची गरज असलेले रुग्ण आणि दुर्गम भागातील शेकडो गरोदर महिला उपचाराच्या आशेने येतात.
मात्र, शासन आणि प्रशासकीय अनास्थेमुळे या रुग्णांना यातनांच्या खाईत लोटले जात आहे. मोफत उपचारांचा डांगोरा पिटणार्या शासनकर्त्यांना आणि प्रशासनाला साध्या सोनोग्राफी तपासणीसाठी तासन् तास यातना सहन करणार्या गरोदर महिलांच्या आणि गंभीर रुग्णांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या लाजीरवाण्या व्यवस्थेविरोधात जनक्रोधाचा भडका उडाला आहे. बंद खोलीत कुलूपबंद असलेले सोनोग्राफी उपकरण तातडीने सुरू करून तिथे कुशल तंत्रज्ञाची नेमणूक करावी आणि निकृष्ट दर्जाचे एक्स-रे यंत्र त्वरित दुरुस्त करावे, अन्यथा या निगरगट्ट प्रशासनाला धडा शिकवल्या शिवाय जनता गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.