loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वतीने सावंतवाडीत १० ऑगस्टला भव्य ‘तिरंगा यात्रा’, पालकमंत्री नितेश राणे राहणार उपस्थित राहणार

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १३ ऑगस्ट दरम्यान ही यात्रा होणार असून, सोमवारी (१० ऑगस्ट) सकाळी १० वाजता सावंतवाडी उपरलकर देवस्थान येथून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे युवा नेते विशाल परब आणि जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकार परिषदेस भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा संयोजक संदीप गावडे, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, प्रसन्न देसाई, शहराध्यक्ष नगरसेवक सुधीर आरीवडेकर, सुहास गवढंळकर, रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे आणि पप्पू परब आदी उपस्थित होते. ​यावेळी माहिती देताना विशाल परब म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी मतदारसंघात देशप्रेम जागृत करण्यासाठी ही रॅली काढण्यात येत आहे. उपरलकर देवस्थान येथून सुरू झालेली ही रॅली सकाळी ११ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पोहोचेल. तिथे माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात येईल. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी 'तिरंगा सेल्फी पॉईंट' उभारण्यात आले असून माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे."

टाईम्स स्पेशल

जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील १४ मंडळांच्या संयोजनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा होणार आहे. १० ते १३ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या उपक्रमात शहीद स्मारक आणि वीर स्तभांची स्वच्छता मोहीम राबवून अभिवादन केले जाईल. तसेच १३ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. ​या तिरंगा यात्रेत सावंतवाडी मतदारसंघातील सर्व देशप्रेमी नागरिक, माजी सैनिक आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg