loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचे भव्य यश , दुर्गम गणेशपूर आणि तिवडी येथे बीएसएनएलचे मोबाईल टॉवर लवकरच कार्यान्वित होणार !

चिपळूण : तालुक्यातील दुर्गम गणेशपूर आणि तिवडी येथे नव्याने उभारण्यात आलेले बीएसएनएलचे मोबाईल टॉवर लवकरच कार्यान्वित होत आहेत. अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या ग्रामस्थांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. या भागातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून गणेशपूर व तिवडी येथे मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी मिळवून देण्यात आली. आता दोन्ही टॉवरचे काम पूर्ण झाले असून ते लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टॉवर सुरू झाल्यानंतर गणेशपूर, तिवडी तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांनाही दर्जेदार मोबाईल नेटवर्कचा लाभ मिळणार आहे. डिजिटल सेवांपर्यंत सहज पोहोच, ऑनलाइन शिक्षण, बँकिंग व्यवहार, शासकीय सेवा आणि आपत्कालीन संपर्क अधिक सुलभ होईल. त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे .

टाइम्स स्पेशल

चिपळूणचे आमदार शेखर निकम सामान्य जनतेसाठी नेहमीच अग्रेसर भूमिका घेतात त्यामुळे चिपळूण तालुक्यातील दर्यापूर यांचा विकास झपाट्याने होत आहे, आता दुर्गम भागात मोबाईल सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांबद्दल ग्रामीण जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg