loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी श्री साई पालखीचे स्वागत

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत श्री साई पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी श्री साई पालखीचे आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ या निवासस्थानी आगमन झाले. यावेळी पल्लवी केसरकर यांनी पालखीचे स्वागत केले, तर आमदार दीपक केसरकर आणि पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साई पालखी व श्रींच्या मूर्तीचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पूजन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा ऍड. नीता कविटकर-सावंत, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, जिल्हा परिषद सदस्या सुधा कवठणकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, आबा केसरकर, गजानन नाटेकर, सुभाष गावडे, विश्वास घाग, सुरेश सावंत, अर्चित पोकळे, महादेव राऊळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, बुधवारी (२९ जुलै) सकाळी ९ वाजता ही श्री साई पालखी माडखोल येथे रवाना होणार आहे. या संपूर्ण पालखी सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg