loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहरातील भाजप संघटनाबांधणीला बळ; वैजेश सागवेकर शक्तीकेंद्र प्रमुख तर राहुल पाटणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्त

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाने खेड शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाच्या संघटन विस्ताराला चालना देण्यासाठी वैजेश सागवेकर यांची भाजप खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख म्हणून, तर राहुल पाटणे यांची भाजप खेड शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असून आगामी स्थानिक तसेच राजकीय उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांना नव्या जोमाने काम करण्याची संधी मिळणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नियुक्तीनंतर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या वैजेश सागवेकर आणि राहुल पाटणे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शक्तीकेंद्र आणि बूथ स्तरावर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. पक्षाची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नवीन कार्यकर्त्यांना जोडणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, प्रदीप भोसले, प्रशांत मुद्राळे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपस्थित मान्यवरांनी वैजेश सागवेकर आणि राहुल पाटणे यांच्याकडून पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. खेड शहरातील प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, हीच आगामी काळातील प्रमुख जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या नियुक्तीबद्दल वैजेश सागवेकर आणि राहुल पाटणे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानत, दिलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg