loader
Breaking News
Breaking News
Foto

‘रक्तदानातून जीवदान... आता देहदानातून मानवतेची अखंड सेवा’ प्रकाश जाधव यांचा आदर्श संकल्प; साठाव्या वाढदिवशी समाजासमोर ठेवला प्रेरणेचा नवा आदर्श

देवगड(प्रतिनिधी)- गेली जवळपास चाळीस वर्षे रक्तदान चळवळीचा प्रचार-प्रसार, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने धावपळ आणि समाजसेवेचा अखंड ध्यास... अशी ओळख असलेले प्रकाश गणपत जाधव यांनी आपल्या साठाव्या वाढदिवशी केलेल्या एका निर्णयाने समाजाला नवी दिशा दिली आहे. राष्ट्रीय अवयवदान दिनाचे औचित्य साधत त्यांनी देहदानासाठी अधिकृत नावनोंदणी करून मानवतेप्रती असलेली आपली बांधिलकी आणखी दृढ केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड तालुक्यात रक्तदानाची चळवळ रुजविणार्‍या अग्रणी कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश जाधव यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वतः नियमित रक्तदान करण्याबरोबरच त्यांनी शेकडो रक्तदाते तयार केले. अनेक रक्तदान शिबिरांचे नियोजन, आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करून त्यांनी असंख्य रुग्णांना जीवनदान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर ते मुंबईपर्यंत त्यांच्या संपर्कातून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध झाले आहे. अनेक गंभीर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ते संकटसमयी आधारवड ठरले आहेत. त्यामुळे रक्तदान क्षेत्रात त्यांच्याविषयी विशेष विश्वास आणि आदराची भावना निर्माण झाली आहे.

टाइम्स स्पेशल

समाजकार्याबरोबरच साहित्य, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे. लेखक, कवी आणि अभ्यासपूर्ण विचार मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अवयवदान जनजागृती अभियानाला, स्वतःच्या कृतीतून बळ देत, त्यांनी देहदानाची नोंदणी केली. ‘‘स्वतः कृती करा आणि समाजाला प्रेरणा द्या,’’ हा त्यांचा संदेश, त्यांच्या या निर्णयातून, अधोरेखित झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg