loader
Breaking News
Breaking News
Foto

गुजरातमध्ये 'चांदीपूरा " विषाणूमुळे २२ मुलांचा मृत्यू ; हा विषाणू किती धोकादायक ?

अहमदाबाद : या पावसाळ्यात गुजरातमध्ये 'चांदीपुरा' विषाणूमुळे चिंता निर्माण झाली आहे. आतापर्यंत संशयास्पद वाटणाऱ्या १८४ रुग्णांपैकी ३५ जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यात २२ मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुले अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. सरकारने सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आणि गंभीर आजारी रुग्णांना त्वरित अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल पानसारिया यांनी सोमवारी सांगितले की, बाधित झालेले सर्व रुग्ण १५ वर्षांखालील मुले आहेत. त्यांनी सांगितले की, गांधीनगर, साबरकांठा-हिम्मतनगर, पाटण, राजकोट आणि भावनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या मुलांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, बाधित मुलांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत आणि त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

टाइम्स स्पेशल

आतापर्यंत राज्यात १८४ संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३५ रुग्णांना 'चंडीपुरा' विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे, तर ११ नमुन्यांची तपासणी सध्या सुरू आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत २२ मुलांचा मृत्यू झाला असून, सात मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. शासनाने स्पष्ट केले आहे की, हा संसर्ग केवळ एका विशिष्ट गावापुरता किंवा क्षेत्रापुरता मर्यादित नसून विविध भागांतून रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात देखरेख आणि सतर्कता वाढवण्यात आली आहे.सैंडफ्लाई (रेत माशी) च्या डंशाने पसरणारा एक तीव्र आणि घातक विषाणुजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने १५ वर्षांखालील लहान मुलांना लक्ष करतो. याची पहिली ओळख १९६५ मध्ये महाराष्ट्रातील चंडीपुरा येथे झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg