इस्लामाबाद, - भारताच्या विभाजनाची स्वप्न पाहणार्या पाकिस्तानचे २ तुकडे झाले आहेत. बलूचिस्तान प्रांताने पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ११ ऑगस्ट हा आपला ’स्वातंत्र्यदिन’ म्हणून साजरा करण्याची मोठी घोषणा केली आहे. ’रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान’ या नावाने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. बलूच नेत्यांनी आता जागतिक समुदायाकडून एका स्वतंत्र आणि सार्वभौम देशाची अधिकृत मान्यता मागितली आहे. या निर्णयामुळे आधीच राजकीय आणि आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.
बलूच स्वातंत्र्याचे प्रमुख नेते मीर यार बलूच यांनी जगातील सर्व बलूच नागरिकांना येत्या ११ ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर, दुकानांवर, शाळांवर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र बलूचिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. १९४७ मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत होत असताना १४ आणि १५ ऑगस्टच्या आधी म्हणजेच ११ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती. मात्र १९४८ मध्ये पाकिस्तानने लष्करी ताकदीचा वापर करून बलूचिस्तानवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला, असा आरोप बलूच नेत्यांनी केला आहे.
बलुचिस्तानला अद्याप कोणत्याही देशाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिलेली नाही. बलूच संघटनांच्या मते, गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानने या भागात हिंसाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि शोषणाचे धोरण राबवले आहे. दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरता हवी असेल, तर स्वतंत्र बलूचिस्तान आवश्यक आहे, असे सांगत बलूच नेत्यांनी संपूर्ण जगातील देशांना आणि संयुक्त राष्ट्रांना बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. बलुचिस्तान प्रजासत्ताकाने लोकांना बलुच ऐक्य दाखवून ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.