loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर भाजी वाहतूक करणारा टेम्पो खोल दरीत कोसळला; सुदैवाने चालक आणि किन्नर सुखरूप

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावर मोरवंडे गावालगत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथून दापोलीच्या दिशेने भाजी घेऊन जाणारा टेम्पो रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मोरवंडे गावाजवळ आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर हा टेम्पो महामार्गाच्या कडेला असलेल्या सुमारे ३० ते ४० फूट खोल भागात जाऊन कोसळला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात सुदैवाने चालक आणि किन्नर सुखरूप बचावले असून कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, या अपघातात टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टेम्पोमध्ये वाहतूक करण्यात येत असलेली भाजीदेखील खराब झाली आहे. मोरवंडे गावाजवळील या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg