loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुडमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेत वाद उफाळला; माजी विद्यार्थ्यांचाच विरोध, सचिवांना माजी विद्यार्थ्यांनी दिले निवेदन

कोर्लई, (राजीव नेवासेकर) - राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार मुरुडच्या सर एस. ए. हायस्कूलमध्ये प्रथमच स्थापन करण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेला माजी विद्यार्थ्यांनीच प्रखर विरोध दर्शविला असून पुन्हा नव्याने माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात यावी. अशी मागणी मुख्याध्यापक यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुरुड मधील जंजिरा विद्यामंडळ संचलित सर एस. ए. हायस्कूल ही आपल्या शहरातील शंभर वर्षांहून अधिक गौरवशाली परंपरा लाभलेली शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले असून आज विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी या संस्थेचे ऋणी आहेत. आम्हीही आज ज्या स्थानावर आहोत, त्याचे श्रेय या संस्थेतील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक आणि संस्थेच्या संस्कारांना जाते. दि. ३१.०७.२६ रोजी माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आल्याचे समजले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, या प्रक्रियेत अत्यंत मोजक्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष इत्यादी पदांची निवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनेक माजी विद्यार्थ्यांमध्ये खेदाची भावना निर्माण झाली आहे. माजी विद्यार्थी संघटना ही सर्व माजी विद्यार्थ्यांची असते. त्यामुळे ती सर्वसमावेशक, पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने स्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक उत्तीर्ण बॅचमधून किमान दोन पुरुष व दोन महिला माजी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करून व्यापक संघटना स्थापन करण्यात यावी. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांना सूचना देऊन त्यांच्या उपस्थितीत, संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत सर्वसाधारण सभा घेऊन संघटनेची निवड करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी आणि संघटना उभारणीसाठी संस्थेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहोत.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे, सध्या स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचा फेरविचार करून सर्व माजी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन नव्याने अधिकृत, सर्वसमावेशक व प्रतिनिधिक माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात यावी, आपण या मागणीचा सकारात्मक विचार कराल.अशी अपेक्षा सर एस.ए.हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी जंजिरा विद्यामंडळ अध्यक्ष सुधाकर दांडेकर, जोशी, प्रमोद भायदे, उदय दांडेकर, पांडुरंग आरेकर, आदेश दांडेकर, कुणाल सतविडकर, अरविंद गायकर, अशिलकुमार ठाकूर, उमेश भोईर, अभिजित सुभेदार, सागर चौलकर, युवराज भगत, माने, गणेश मसाळ, प्रतिक उमरोटकर, महेश मानकर, ललित जैन, जागन पुलेकर, विशाल कोलवणकर, सुशील ठाकूर, निलेश पुलेकर, नरेंद्र माने आदी. माजी विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg