loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटना व रॅलीज इंडिया कंपनी लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने बिजघर नं. १ शाळेत वह्यावाटप

बिजघर - ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो, या प्रगल्भ भावनेतून मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बिजघर गावचे सुपुत्र सदानंदराव भोसले व रॅलीज इंडिया कंपनी लोटे यांच्या संयुक्त विद्यमाने बिजघर नं १ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावच्या प्रशासक शुभांगी भोसले, मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सदानंदराव भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख महेश राव मोरे, निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, मानकरी सुनीलराव भोसले, तिसंगी येथील प्रतिष्ठित नागरिक अनंतराव भोसले, विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, अनिल जाधव, राजू, उपाध्यक्ष निवृत्त पोलीस अधिकारी लक्ष्मणराव भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी संजयराव भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वामन भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी सुप्रियाताई भोसले, राजश्री सदानंद भोसले, वसंतराव भोसले, दशरथ भोसले, चंद्रकांतराव भोसले, संजय दत्ताराम भोसले, आकांक्षा जंगम, कीर्ती मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार शैलेश पराडकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg