संगमेश्वर (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर शहराला महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सततच्या पावसामुळे या जोडरस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पावसाचे पाणी संगमेश्वर बस स्थानक परिसरातही साचत असून प्रवासी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. संगमेश्वर बस स्थानकातून मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याशिवाय माभळे–संगमेश्वर सोनवी पूल जोडरस्ता, सोनवी पुलाखालून देवरुखकडे जाणारा मार्ग तसेच संगमेश्वर बस स्थानक–देवरुख रस्त्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले असून वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. बसचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना जोडरस्ते सुरक्षित आणि वाहतुकीयोग्य ठेवणे अपेक्षित होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
याबाबत प्रसिद्ध व्यापारी दिलीप रहाटे यांनी सांगितले, "जोडरस्ते चिखलमय आणि खड्डेमय झाल्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेत ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यापारावरही विपरीत परिणाम होत आहे. चौपदरीकरणाच्या कामासोबत जोडरस्त्यांची योग्य व्यवस्था करणे आवश्यक होते. संबंधित यंत्रणेने तातडीने चिखल हटवून खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी." स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराने तात्काळ उपाययोजना करून चिखल हटवावा, खड्डे बुजवावेत, पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि जोडरस्ते सुरक्षित करावेत, अशी जोरदार मागणी केली आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.