loader
Breaking News
Breaking News
Foto

विश्व योगासन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती तन्वी रेडीजचा जिल्हा युवा प्रतिष्ठानतर्फे गौरव

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - विश्व योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या तन्वी रेडीज हिचा श्री संत गोरा कुंभार जिल्हा युवा प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी तन्वीचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करताना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. निलेश कुंभार यांनी तन्वीच्या अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पणाचे कौतुक केले. तन्वीच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धांसाठी तन्वीला आवश्यक ती सर्व मदत श्री संत गोरा कुंभार जिल्हा युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. निलेश कुंभार यांनी दिली. तसेच युवा पिढीने तन्वीच्या यशातून प्रेरणा घेऊन क्रीडा व योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तन्वीनेही भविष्यात अधिक जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आणखी मोठे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

टाईम्स स्पेशल

यावेळी श्री संत गोरा कुंभार जिल्हा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पडवेकर, जिल्हा संघटक नाना पालकर, मार्गदर्शक जनार्दन मालवणकर, सहसचिव अमित बुरुंबाडकर, खजिनदार अनिल पडवेकर, पदाधिकारी संतोष साळवी, तन्वीचे वडील भूषण रेडीज तसेच योग शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg