loader
Breaking News
Breaking News
Foto

खाच-खड्‌ड्यांच्या त्रासातून अखेर सुटका! दापोली-कोळथरे मार्गावर खड्डे भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू; प्रवाशांसह चालकांचा सुटकेचा निश्वास

(दापोली- सागर गोवळे)- तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि सातत्याने वर्दळीचा मानला जाणारा महाडिक स्टॉप ते कोळथरे हा मुख्य रस्ता अखेर खड्डेमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्‌ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. मात्र, प्रशासनाला अखेर जाग आली असून गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम अगदी युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाडिक स्टॉप ते कोळथरे या मार्गावर लहान-मोठी खाजगी वाहने, दुचाकी आणि लालपरी म्हणजेच एसटी बसची सतत प्रचंड वाहतूक असते. मात्र, रस्त्याची चाळण झाल्यामुळे चालकांना गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. खड्‌ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहनांचे नुकसान होत होते, तर पाठीच्या आणि कंबरेच्या त्रासाने प्रवासी हैराण झाले होते. अपघाताची टांगती तलवार सतत डोक्यावर असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात होती.

टाइम्स स्पेशल

प्रवाशांचा वाढता असंतोष आणि त्रासाची गंभीर दखल घेत अखेर प्रशासनाने हालचाल केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या संपूर्ण पट्‌ट्यात खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू आहे. कामाचा वेग पाहता लवकरच हा प्रवास सुकर आणि सुरक्षित होणार आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने कोळथरे परिसरातील ग्रामस्थ, चाकरमानी आणि रोजची ये-जा करणार्‍या वाहनचालकांनी आनंद होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg