पनवेल - भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक हिताच्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रिव्हरसाईड बी अँड जे हॉस्पिटलच्या वतीने डॉ. विनय जसवाल, डॉ. प्रितीश बागुल आणि डॉ. अरुणकुमार भगत यांनी ऑटोमेटेड ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर(एईडी) मशीन भेट दिले आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन हे जीवनरक्षक उपकरण पनवेल आणि मानसरोवर रेल्वे स्थानकात कार्यान्वित करण्यात येणार आहे.अचानक हृदयक्रिया बंद पडणे ही अत्यंत गंभीर आणि जीवघेणी आपत्कालीन परिस्थिती आहे. अशा वेळी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. रुग्णाला वेळेत सीपीआर आणि एईडी उपलब्ध झाल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे गर्दीची ठिकाणे असलेल्या रेल्वे स्थानकांवर एईडी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
एईडी हे हृदयाची विद्युत क्रिया तपासून आवश्यक असल्यास विद्युत धक्का देऊन हृदयाची नियमित गती पूर्ववत करण्यास मदत करणारे जीवनरक्षक उपकरण आहे. हे उपकरण वापरण्यास तुलनेने सोपे असून, त्यामध्ये देण्यात येणार्या ध्वनी सूचनांचे पालन करून प्रशिक्षित किंवा प्राथमिक मार्गदर्शन घेतलेली व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर करू शकते.सार्वजनिक ठिकाणी एईडी का आवश्यक? अचानक हृदयक्रिया बंद पडण्याची घटना कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी घडू शकते. अशा वेळी रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंतचा कालावधी अत्यंत निर्णायक ठरतो. सीपीआरआणिएईडीचा तातडीने वापर केल्यास रुग्णाला जीवनदान मिळण्याची शक्यता वाढते.
रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल, शाळा-महाविद्यालये, क्रीडा संकुले, कार्यालये, मंदिरे तसेच विविध सार्वजनिक सभास्थळांवर एईडी उपलब्ध असणे त्यामुळे अत्यंत उपयुक्त ठरते. जीवन वाचविण्यासाठी सामाजिक जबाबदारी ज्याप्रमाणे सार्वजनिक इमारतींमध्ये अग्निशामक यंत्र आवश्यक मानले जाते, त्याचप्रमाणे एईडी हेही जीवनरक्षक उपकरण म्हणून सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. यासोबतच नागरिकांना सीपीआर आणि एईडी वापराबाबत प्राथमिक प्रशिक्षण मिळाल्यास आपत्कालीन परिस्थितीत अनेक मौल्यवान जीव वाचविणे शक्य होऊ शकते. कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक भेट नसून सार्वजनिक आरोग्य आणि जीवनरक्षणाला प्राधान्य देणारा सामाजिक संदेश ठरत आहे.हृदयक्रिया बंद पडल्यावर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. वेळेवर सीपीआर आणि एईडी मिळाल्यास मृत्यूला थांबवून जीवनाला नवी संधी देता येते, या विचारातून साकारलेला हा उपक्रम पनवेलकरांसाठी निश्चितच जीवनदायी ठरणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.