loader
Breaking News
Breaking News
Foto

विलवडे स्थानकाच्या प्रश्नांबाबत आज मुंबईत सभा

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावरील विलवडे (ता. लांजा) रेल्वेस्थानकावरील विविध समस्या आणि त्या सोडविण्याकरिता आंदोलन उभारण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत आज शनिवारी, दि. १ ऑगस्ट रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे.या साऱ्याबाबत चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी शनिवारी, सायंकाळी साडेपाच वाजता १, साईनाथ चाळ, गणेश नगर, हिरानंदानीच्या बाजूला, पवई मुंबई ७६ येथे कार्यकर्त्यांची सभा होणार आहे. सभेला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन विलवडे रेल्वे स्टेशन प्रवासी संघटनेचे सल्लागार आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण रेल्वेवरचे विलवडे रेल्वेस्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. या रेल्वे स्थानकावरून आजूबाजूच्या ७० गावांतील लोक प्रवास करतात. या स्टेशनचे उत्पन्नही चांगले आहे. मात्र या स्थानकावर पुरेशा गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या स्थानकावरून आरक्षणही मिळत नाही. परिणामी गाड्यांमध्य बसायला जागा मिळत नाही. त्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या कोकणातील अग्रगण्य संस्थेने पुढाकार घेऊन विलवडे रेल्वे प्रवासी संघटना स्थापन केली. गेल्या तीन वर्षांत या संघटनेने आपल्या परीने प्रयत्न केले. विलवडे स्थानकावरच्या भौतिक सुविधांबाबत आणि स्थानकावर अधिक गाड्या थांबवण्याबाबत संबंधित कार्यालयांमध्ये अर्जविनंत्या केल्या. लोकप्रतिनिधींना भेटून प्रश्न मांडले.

टाइम्स स्पेशल

या संघटनेच्या सततच्या प्रयत्नांमुळे रेल्वे स्थानकावरच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या. विजेचे दिवे, पंखे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, निवारा, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी कामे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली. गाड्यांच्या बाबतीत कायमस्वरूपी गाडी मिळाली नाही, मात्र सणासुदीला अनेक गाड्या स्थानकावर थांबत असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र स्थानकावर दुसऱ्या फलाटाची गरज असून स्थानकावर किमान चार गाड्या थांबणे, दिवसातून किमान एक रत्नागिरी-सावंतवाडी फेरी आवश्यक आहे त्याकरिता सावंतवाडी टर्मिनस पूर्णत्वास येणे गरजेचे आहे. विलवडे रेल्वे स्थानकापासून एसटीची सुविधा योग्य प्रमाणात मिळत नाही,अशी खंत नागरिक व्यक्त करीत आहेत .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg