loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी बाजारपेठ ते करुणा सदन विद्यालय गटारे गाळाने भरली संबंधित ठेकेदार यांचे दूर्लक्ष

साटेली भेडशी(प्रतिनिधी)- साटेली-भेडशी बाजारपेठ ते करुणासदन या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूंची गटारे मातीने पूर्णपणे भरल्याने, पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, परिसरात अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.तेव्हा तातडीने गटारांची साफसफाई संबंधित ठेकेदार याने करावी, अशी मागणी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून, पायी जाणार्‍या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.

टाइम्स स्पेशल

याबाबत रस्ते विकास महामंडळाने तातडीने दखल घेऊन दोन्ही बाजूंची गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी साटेली-भेडशीच्या उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांनी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न लावता आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg