loader
Breaking News
Breaking News
Foto

पालपेणे मधलीवाडी येथील आदर्श शाळा नं. २ येथे मनविसे गुहागरच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पालपेणे मधलीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा नं. २ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपत विशेष उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेला राष्ट्रपुरुष आणि समाजसुधारकांचे फोटो फ्रेम भेट देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित पालक तसेच ग्रामस्थ यांना काजूचे झाड भेट देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विशेष कार्यक्रमासाठी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, पत्रकार गणेश किर्वे, मनविसे गुहागर तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, तालुका सचिव प्रशांत साटले, मनसे उप तालुकाध्यक्ष व पालपेणे शाळा नंबर २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित खांडेकर, स्वप्निल जाधव, मनसे गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, मनसे कौंढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनी मुकनाक, सुजित गांधी, अनुज भुवड, राहुल जाधव, सुमित पवार, पालपेणे ग्रामपंचायत उपसरपंच दिलीप पाष्टे, सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर, राजेश घाणेकर, मोहन घाणेकर, शैलेश घाणेकर, मुख्याध्यापक विश्वास सावंत, शिक्षक अशोक पाष्टे, मदन गिजे, माजी मुख्याध्यापक मनोहर पवार, अनुज भुवड, विनायक घाणेकर, परेश कदम नरेश वणे, श्रावणी टाणकर, व सर्व ग्रामस्थ व पालक बहुसंख्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी तसेच इतर सर्व मान्यवर यांचासत्कार शाळा तसेच पालपेणे शाळा नं.२ ची शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अशोक पाष्टे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विश्वास सावंत यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg