loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये एसटी बसमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीची छेडछाड; वाहकावर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार संजय कदम आक्रमक

खेड (प्रतिनिधी )-- भरणे–खेड मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची वाहकानेच छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार संजय कदम यांनी खेड बसस्थानक गाठत आक्रमक भूमिका घेतली. संबंधित एसटी वाहकावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी खेड आगारातील अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी कॉलेज प्रशासन आणि संबंधित विद्यार्थिनींनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेची माहिती समोर येताच खेड बसस्थानकात संतापाचे वातावरण निर्माण झाले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, यापूर्वी दापोली आणि मंडणगड येथील एसटी स्थानकांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अशाच प्रकारच्या घटना समोर आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता खेडमध्येही अशी घटना समोर आल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg