पनवेल (हरेश साठे)- रायगड, नवी मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. ‘‘लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दूरदृष्टी, ध्येयधोरण आणि सक्षम नेतृत्वाखाली या संस्थेने केवळ पनवेल परिसराचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला आहे,’’ असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी काढले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ च्या भव्य मूट कोर्टचा उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्याहस्ते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार महेश बालदी, संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, शकुंतला ठाकूर, ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, संस्थेचे संचालक व नगसरेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनराज विसपुते, जी. के. गुजर चॅरिटेबल ट्रस्टचे व्हाईस चेअरमन इंद्रजीत गुजर, विरेंद्र गुजर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी.गडदे, संस्थेचे संचालक अनिल भगत, संजय भगत, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, ऍड. राहुल घरत, स्वप्निल ठाकूर, अमोघ ठाकूर, व्हीडीआयपीएलचे वैभव देशमुख, प्राचार्या सान्वी देशमुख, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.