रत्नागिरी दि. २ ऑगस्ट (वार्ताहर) : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक, नागपूर) उपक्रेंद्र अर्थात भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळेचा उल्लेखनीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याबद्दल गौरव कुलगुरु डॉ. अतुल वैद्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या इतर संस्थांचाही सन्मान करण्यात आला.
वेदपाठशाळेच्या वतीने हा सन्मान जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रामलोचन ठाकूर तसेच वेदपाठशाळेचे प्राचार्य कीर्तीकुमार भोसले यांनी स्वीकारला. या वेळी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या लेखणीतून साकारलेला 'गोवेश्वर महिमा संहिता' हा ग्रंथ अध्ययन भेटस्वरूप प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रोशन अलोने, साहित्य विभागाच्या अधिष्ठाता प्रा. कविता होले, वेद व व्याकरण विभागाचे अधिष्ठाता प्रा. हरेकृष्ण अगस्ती, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने श्रीक्षेत्र नाणीज येथे स्थापन करण्यात आलेली आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य वेदपाठशाळा गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. येथे हिंदू समाजातील सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य वेद व पौरोहित्याचे शिक्षण दिले जाते. आजवर हजारो विद्यार्थी या संस्थेतून शिक्षण पूर्ण करून समाजात धर्म, वेद आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार करत आहेत. पौरोहित्याच्या माध्यमातून स्वावलंबी होऊन स्वतःचा चरितार्थ चालवित आहेत. स्वरूप काणे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. रोशन अलोने यांनी उपस्थितांप्रती आभार व्यक्त केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.